तिरुवनंतरपुरम – सोशल मीडियावर केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याबद्दल आक्षेर्पाह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या ११९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विजयन यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात वादग्रस्त मजकूर लिहणाऱ्यांवर करण्यात आली आहे. केरळच्या गृहविभागाने यासंबंधी आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे.
केरळच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल
याबाबत केरळ विधानसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ११९ जणांवर गेल्या तीन वर्षांत कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ राज्य सरकारचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जानेवारी २०१९ मध्ये यासंबंधी विधानसभेत इंडियन युनियन मुस्लीम लीगचे नेते एम. के. मुनीर यांनी प्रश्न विचारला होता. केरळ गृहविभागाने ही माहिती त्यावर उत्तर देत प्रकाशित केली आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल एकूण ११९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ३ वर्षांपासून ही कारवाई करण्यात आली आहे.