आपले ह्रदय मोठे करीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत केली आहे. अमिताभ यांनी यावेळी बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज स्वतः फेडले आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे.
महानायकाने फेडले तब्बल २१०० शेतकऱ्यांचे कर्ज
आपल्या ब्लॉगमध्ये बिग बी लिहितात, मी आश्वासन पूर्ण केले. ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) च्या माध्यमातून बिहारमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज बाकी होते अशा २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. यातील काही शेतकऱ्यांना बीग बी यांचा बंगला जनक येथे बोलावून अभिषेक आणि श्वेताच्या हस्ते कागदपत्रे देण्यात आली.
या अगोदर अमिताभ यांनी लिहिले होते, बिहारच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही भेट आहे. अमिताभ यांनी अशा प्रकारे मदत करण्याचा हा पहिला प्रकार नाही. त्यांनी गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील हजार शेतकऱ्यांची कर्जे अमिताभ यांनी परत केले होते. आणखी एक आश्वासन पूर्ण केल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. अमिताभ यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी भरले होते.