या लंका मिनारात भाऊबहिण एकत्र जाण्यावर बंदी


उत्तर प्रदेशातील जालौन येथे १८७५ साली बांधल्या गेलेल्या २१० फुटी अनोख्या लंका मिनारात रावणाच्या संपूर्ण कुतुमाबाचे चित्रण केले गेले आहेच पण येथील विशेष म्हणजे या मिनारात सख्खे बहिण भाऊ एकत्र जाऊ शकत नाहीत. हा मिनार रामलीलेत अनेक दशके रावणाची भूमिका साकारलेले नात मथुराप्रसाद यांनी त्याकाळी पावणेदोन लाख रुपये खर्चून उभारला आहे. यासाठी शिंपले, शंख, उडीद डाळ, कवड्या यांचा वापर केला गेला व हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी २० वर्षे लागली. हा मिनार कुतुबमिनार नंतर भारतातील दोन नम्बरचा उंच मिनार आहे.

मथुराप्रसाद रावणाची भूमिका करताना रावणाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी हा मिनार बांधण्याचा निर्णय घेतला. येथे १०० फुटी कुंभकर्ण व ६५ फुटी रावणपुत्र मेघनाद यांच्या प्रतिमा आहेत. तसेच मिनारासमोर चित्रगुप्त व शंकर यांच्या मूर्ती आहेत. मिनाराचे बांधकाम असे आहे कि रावणाला चोवीस तास शंकराचे दर्शन होऊ शकेल. कारण रावण हा मोठा शिवभक्त होता.


येथे १५० फुट लांबीचा नाग व ९५ फुट लांबीची नागीण गेटवर मूर्तीस्वरुपात विराजमान आहेत. नागपंचमीला येथे मोठी जत्रा भरते. कुस्तीचे फड लागतात. या मिनारात वर चढून जाताना ७ वेळा गोल गोल फेरी मारत वर जावे लागते म्हणून येथे बहिण भाऊ एकत्र जात नाहीत. कारण हिंदू परंपरेप्रमाणे फक्त पती पत्नी एकत्र सात फेरे घेऊ शकतात.

Leave a Comment