गुगल मॅपमध्ये अतिशय उपयुक्त फिचर्स गुगलने अॅड केले आहेत. कंपनीने नुकतेच SOS अलर्टस, ऑन-स्क्रीन स्पीडोमीटर यांच्या समवेत 3 नवे फिचर्स अॅड केले आहेत. यात ट्रेन, बसचे लाईव्ह स्टेटस देखील कळू शकेल. गुगल आता लवकरच एक नवे फिचर युजर्ससाठी आणणार आहे.
गुगल मॅप्समध्ये जोडले गेले अतिशय उपयुक्त फिचर्स
तुमचा प्रवास या फिचरमुळे अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. या नव्या फिचर अंतर्गत तुमची गाडी जर चुकीच्या मार्गाने जात असल्यास तुम्हाला लगेचच अलर्ट केले जाईल. चुकीच्या मार्गाने 500 मीटर गेल्यास गुगल मॅप्स लगेचच अलर्ट देईल. तुम्ही प्रवास करत असेपर्यंत हे फिचर काम करेल. यामुळे तुम्ही रस्ता चुकण्याचेही भीती नाही.
गुगल मॅप्सचे हे फिचर XDA डेव्हलपर्स द्वारे सर्वात पहिले स्पॉट करण्यात आले होते आणि सर्व भारतात हे फिचर उपलब्ध असेल. तसेच प्रवासादरम्यान तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देखील हे फिचर फायदेशीर ठरेल. तुम्हाला या फिचरचा वापर करण्यासाठी गुगल मॅप्समध्ये जाऊन तुमचे डेस्टिनेशन सिलेक्ट करावे लागेल. यानंतर स्क्रीनच्या खाली Stay Safer बटणावर क्लिक करा. Stay Safer या फिचर अंतर्गत दोन पर्याय मिळतील. यावरुन तुम्ही आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईक, घरच्या मंडळींसोबत लाईव्ह लोकेशन शेअर करु शकता. तसेच याद्वारे तुम्हाला ऑफ रुट अलर्ट देखील मिळेल.