लवकरच ‘तुफान’ या चित्रपटाद्वारे अभिनेता फरहान अख्तर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. फरहान या चित्रपटात ‘बॉक्सर’ची भूमिका साकारत आहे. तो यासाठी खूप परिश्रम करत आहे. त्याने या चित्रपटाची तयारी करत असल्याचा एक फोटो अलिकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आगामी चित्रपटात फरहान अख्तर साकारणार बॉक्सरची भूमिका
एका माध्यमाशी बोलताना या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले होते, की या चित्रपटासाठी फरहान आणि मी फार उत्सुक आहोत. आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने ६ वर्षांनंतर एकत्र आलो आहोत. या चित्रपटाच्या कथानकावर अंजुम राजाबली हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या चित्रपटाचे अपडेट्स फरहान चाहत्यांशी शेअर करत असतो. ‘तुफान’ची तयारी करत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.