सलमानने जाहीर केली ‘सूर्यवंशी’ची नवी रिलीज डेट


पुढच्या ‘ईद’ला अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांची होणारी टक्कर टळली असून खुद्द भाईजाननेच आता अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केल्यामुळे सलमानच्या आधी प्रेक्षकांना अक्षयचा ‘सुर्यवंशी’ चित्रपट पाहायला मिळणार आहे.


अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. तर, त्याच दिवशी म्हणजेच पुढच्या वर्षी ईदला सलमान खानचा ‘इन्शाल्ला’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार होता. त्यामुळे अक्षय आणि सलमानच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार होती. पण ‘सूर्यवंशी’ चित्रपट आता २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, सलमान खानचा ‘इन्शाल्ला’ हा ‘ईद’च्या मुहूर्तावरच प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, संजय लिला भन्साळी हे ‘इन्शाल्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अलिकडेच ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Leave a Comment