रिंकूचे मानधन ऐकूण व्हाल थक्क


मुंबई : सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरु महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक घरात पोहचली. त्यानंतर तिने कन्नडमधील सैराटमध्ये काम केले. आता नुकतीच ती कागर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचे देखील खूप कौतूक झाले. पण आता रिंकूचा मराठी सिनेसृष्टीतला भाव वधारला आहे.

सध्या चित्रपटाच्या निर्मात्यांना तिचा चित्रपट असला की मीडियावाले हटकून दखल घेतात हे बरोबर कळले आहे. त्यामुळेच त्यांची वाट्टेल ती किंमत देऊन रिंकूला चित्रपटात घेण्याची धडपड चालू आहे. म्हणूनच मंडळी सध्या मराठी इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रिंकूने नंबर एक मिळवला आहे.

सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा ग्लॅमरस तारकांच्या मानधनाची आजपर्यंत चर्चा व्हायची. साधारण 15 लाखांच्या घरात मानधन मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींना मिळते. पण यात रिंकूने बाजी मारली आहे. रिंकू आगामी ‘मेकअप’ चित्रपटात दिसणार आहे. तिने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे याची माहिती तुम्हाला आहे का… तर निर्मात्याने रिंकूला या चित्रपटासाठी तब्बल 27 लाख रुपये देऊ केले आहेत. एखाद्या नवख्या अभिनेत्रीला एका चित्रपटासाठी 27 लाख मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती संस्था आटपाट रिंकूची सगळी मॅनेजमेंट करते. तर नुकताच रिंकूच्या मानधनाचा आटपाट आणि निर्मात्यांमध्ये करार झाला आहे. रिंकूची मॅनेजमेंट तर आटपाट करतेच. त्याचबरोबर रिंकूसाठी लागणारी सगळी सुरक्षा आटपाट पुरवते.

Leave a Comment