मणिपूरच्या या पठ्ठ्याने शोधला व्हॉट्सअॅप बग, फेसबुकने केला गौरव


व्हॉट्सअ‍ॅप हे सध्याच्या घडीला किती महत्वाचे झाले आहे याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलाच आहे. त्यातच व्हॉट्सअॅप देत असलेल्या विविध फिचर्समुळे अनेकजण आपल्या व्यवसायात वाढ करत आहेत. त्यातच व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्कात असतो. पण युजर्सच्या प्रायव्हसीचा व्हिडिओ कॉलिंग दरम्यान भंग होत असल्याचे एका मणिपुरी इंजिनिअरने समोर आणले आहे. त्याला फेसबूकने हा व्हॉट्सअ‍ॅप बग शोधल्याप्रकरणी 500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस आणि त्याचे नाव फेसबुक हॉल ऑफ फेम 2019मध्ये नोंदवून त्याचा गौरव केला आहे.

हा व्हॉट्सअ‍ॅप बग मणिपूर येथील इंफाळ येथे Zonel Sougaijam या 22 वर्षीय सिव्हिल इंजिनियरने शोधून काढला आहे. ‘फेसबुक हॉल ऑफ फेम 2019’या प्रतिष्ठित यादीमध्ये 94 जणांच्या नावात त्याचे नाव 16 व्या स्थानी आहे.

व्हॉट्सअ‍ॅप द्वारा व्हॉईस कॉल केल्यानंतर तो युजर्सच्या परवानगीशिवाय व्हिडिओ कॉलसाठी अपग्रेड होत असल्यामुळे बोलता बोलता थेट ते एकमेकांना पाहु शकत होते. फेसबुकला हा दोष Zonel Sougaijam ने दाखवून दिल्यानंतर 15-20 दिवसात त्यावर ठोस उपाय करण्यात आला. फेब्रुवारी 2014 साली फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअ‍ॅप हे चॅटिंग अ‍ॅप विकत घेतले आहे.

Leave a Comment