फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणारा कोहली एकमेव भारतीय खेळाडू


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने फोर्ब्सने जाहीर केलेल्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये १०० वे स्थान पटकावले आहे. तो १०० जणांच्या या यादीमध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे.

फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहिर केली आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार विराटने मागील एका वर्षात २.५ कोटी डॉलर एवढी कमाई केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी जाहिरातींमधून २.१ कोटी डॉलर तर, वेतन आणि जिंकलेल्या मानधनातून ४० लाख इतकी कमाई त्याने केली आहे.

विराट गेल्या वर्षी फोर्ब्सच्या यादीमध्ये ८३ व्या स्थानी होता. त्याच्या स्थानात यंदा घसरण झाली आहे. असे असले तरी, जाहिरातींमधून येणारे उत्पन्न हे १० लाख डॉलरने वाढले आहे. या यादीमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसी अव्वल स्थानावर आहे.

Leave a Comment