जगभरात ‘भारत’ने ओलांडला २५० कोटींचा टप्पा


सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खान, कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अद्यापही हा बहुचर्चित चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. ‘भारत’ची कमाई १५० कोटी रुपयांहून अधिक देशात झाली आहे तर या चित्रपटाने जगभरात कमाईचा २५० कोटींचा टप्पा गाठला आहे.


सोशल मीडियावर ही माहिती कतरिना कैफ व अतुल अग्निहोत्री यांनी दिली. चित्रपटाने जगभरात २५० कोटी रुपयांची कमाई केली असून अजूनही हा आकडा वाढणार असल्याचे ट्विट अतुल अग्निहोत्रीने केले आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कतरिनानेही सलमानचा फोटो ठेवला आहे.

Leave a Comment