या दिवशी रिलीज होणार कंगना-राजकुमारच्या ‘मेंटल है क्या’चा ट्रेलर


‘मणिकर्णिका’ चित्रपटानंतर बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात राजकुमार राव देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले. चाहत्यांना या पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे.

राजकुमार राव आणि कंगना हे ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. दोघांचाही हटके लूक या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाहायला मिळाला. दोघेही या चित्रपटात मनोरुग्ण दाखविण्यात येणार आहेत. खऱ्या आयुष्यातही कंगना मानसिक तनावाला सामोरी गेली असल्याने या चित्रपटाची निवड केली असल्याचे तिने सांगितले होते.

या चित्रपटाचा ट्रेलर आता १९ जूनला रिलीज करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या शिर्षकावरून काही वादही झाले होते. मात्र, आता हेच शिर्षक ठेवून चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment