ओप्पो पॉप अप कॅमेरयासह आणणार फोल्डेबल फोन


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पो खास प्रकारचा फोल्डेबल फोन बाजारात आणणार असून या फोनला पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. यासाठी कंपनीने ऑक्टोबर २०१८ मध्ये वर्ल्ड इंटलेक्च्यूअल प्रॉपर्टी ऑफिस म्हणजे डब्ल्यूआयपीओ पेटंट दाखल केले होते त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे असे समजते.

शाओमी, अॅपल सह अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या फोल्डेबल फोन आणण्याच्या तयारीत आहेत तर सॅमसंग, हुवावे यांनी अगोदरच फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अप्पोने मात्र यात आणखी पुढचे पाउल टाकले असून फोल्डेबल फोन साठी पॉप अप कॅमेरा देण्याची तयारी केली आहे. फोनचा हा फ्रंट कॅमेरा मोटोराईज्ड असेल आणि सेल्फीसाठी जेव्हा कॅमेरा आयकॉन वर युजर क्लिक करेल तेव्हा या फोल्डेबल फोनचा कॅमेरा बाहेर येणार आहे.

पेटंट लिस्टिंग वरून या फोनची काही फिचर समोर आली आहेत. त्यानुसार या फोनसाठी इमार्सिव्ह फुल स्क्रीन डिझाईन असेल. फोनचा पॉप अप कॅमेराही खास असेल म्हणजे तो अश्या प्रकारे फिट केला गेला आहे, कि, फोन फोल्डेड स्थितीत असला किंवा अन्फोल्डेड स्थितीत असला तरी युजर पॉप अप कॅमेरा वापरू शकणार आहे. फोनचे हिंजेस मागच्या बाजूला असून ते फोनला सपोर्ट करणारे आहेत. पॉप अप कॅमेरा दोन सेन्सरसह आहे. या फोनचा प्रोटोटाईप २०१९ च्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर करण्यात आला होता.

Leave a Comment