आता चीनी बाईक्सचे ऑटो बाजारावर आक्रमण


चीन मधली प्रीमियम मोटारसायकल कंपनी सीएफ मोटो जुलै मध्ये भारतीय ऑटो बाजारात प्रवेश करत असून पहिल्या पावलात तीन दणकट बाईक्स येथे सादर केल्या जाणार आहेत. मोटो ६५० एनके, ६५० एमटी आणि ६५० जीटी अशी या मॉडेल्सची नावे आहेत. या वर्षाच्या सुरवातीला भारतीय रस्त्यांवर सीएफ मोटोच्या ६५० एमटी बाईक टेस्टिंग दरम्यान दृष्टीस पडल्या होत्या. ही अॅडव्हेन्चर टुरिंग बाईक आहे.


सीएफ मोटो ६५० एमटी बाईकला ट्वीन पॉड हेडलॅम्प, अॅडजस्टीबल विंडस्क्रीन, अंडरसाईड एक्झॉस्ट व स्टेप्ड सीट दिली गेली आहे. ६५० एनके हे नेकेड स्ट्रीट बाईक आहे तर ६५० जीटी सेमी फेअर्ड टूरर बाईक आहे. या तिन्ही बाईकसाठी ६४९.३ सीसीचे लिक्विड कुल पॅरलल ट्वीन सिलिंडर इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्स सह दिले गेले आहे. या तिन्ही बाईक साधारण ६ लाख रुपये किमतीच्या असतील असे सांगितले जात आहे. त्यात ६५० एनके सर्वात कमी किमतीची असेल.


या कंपनीने भारतात त्यांच्या बाईक बनविण्यासाठी एएमडब्ल्यू मोटारसायकल बरोबर भागीदारी करार केला असून बंगलोर येथे नवीन उत्पादन प्रकल्प सुरु केला आहे. या युनिट मध्ये दरवर्षी १० हजार मोटरबाईक्सचे उत्पादन केले जाईल असे समजते. मेक इन इंडिया योजनेखाली हे उत्पादन केले जाणार आहे.

Leave a Comment