शिखरच्या जागी ‘या’ चार खेळाडूंना मिळू शकते संधी


लंडन – भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवन बाहेर पडल्यामुळे धवनच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धवनच्या जागी खालील चार खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते.

आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळे जर सलामीला लोकेश राहुलला पाठवले तर अय्यरचा चौथ्या क्रमांकासाठी विचार होऊ शकतो. त्याचबरोबर रिषभ पंतची या स्पर्धेसाठी चर्चा मोठ्या प्रमाणावर चालू होती. पण त्याची संधी हुकली. आता त्याचे नाव धवनच्या दुखापतीमुळे परत वर आले आहे. अंबाती रायडू चांगले प्रदर्शन करुनही स्पर्धेसाठी निवड न झाल्यामुळे निराश झाला होता. पण संघात आता रायडूचा विचार होऊ शकतो. सध्या काउंटी क्रिकेट अजिंक्य रहाणे खेळत आहे. त्याचा देखील सलामीचा फलंदाज म्हणून विचार होऊ शकतो.

Leave a Comment