‘साहो’च्या नव्या पोस्टरमध्ये श्रद्धा कपूरचा दमदार अंदाज


लवकरच प्रभाससोबत ‘साहो’ चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही झळकणार आहे. श्रद्धा कपूरची दमदार झलकही ‘साहो’च्या एका छोट्या टीजरमध्ये पाहायला मिळाली होती. तिचा दमदार लूक असलेले पोस्टर आता रिलीज करण्यात आले आहे.

हे पोस्टर श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या चित्रपटाचा नवा टीजर प्रेक्षकांना १३ जूनला पाहायला मिळणार असल्याचेही तिने सांगितले. श्रद्धा आणि प्रभास या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. बऱ्याच दिवसापासून चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू या ३ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


या चित्रपटात श्रद्धा आणि प्रभास व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अर्जुन विजय आणि मुराली शर्मा हे कलाकारही झळकणार आहेत. अॅक्शन थ्रिलर असलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा या चित्रपटानंतर वरुण धवनसोबत ‘स्ट्रिट डान्सर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच टायगर श्रॉफसोबत ‘बागी -३’ आणि सुशांत सिंगसोबत ‘छिछोरे’ चित्रपटातही ती भूमिका साकारत आहे.

Leave a Comment