सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश


औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बेलखंडी मठाला बक्षीस म्हणून सरकारी जमीन दिली होती. धनंजय मुंडे यांनी तिच जमीन पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. खरेतर बक्षीस मिळालेल्या कुठल्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण येथे खरेदी व्यवहार दबाव आणून केल्याचे याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी याचिकेत म्हटले आहे.

जमिनीवर पीक होत असताना त्या जमिनीला नापिक बनवण्यात आली आहे. फड यांनी याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण याप्रकरणी संबंधित पोलिसांनी कुठलीही पावले न उचल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश यावेळी दिले आहे.

Leave a Comment