मुक्ता बर्वेच्या आगामी ‘स्माईल प्लिज’चे पहिले पोस्टर रिलीज


लवकरच एका चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातून नावारुपास आलेला अभिनेता ललित प्रभाकर या दोघांची जोडी झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘स्माईल प्लिज’ असे आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात मुक्ता आणि ललित प्रभाकर यांच्याव्यतिरिक्त प्रसाद ओक आणि आदिती गोवारीकर हे देखील झळकणार आहेत. विक्रम फडणीस हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लवकरच या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, २६ जूनला ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment