३० जूनपासून पुन्हा एकदा ‘मन की बात’


नवी दिल्ली – पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ सुरु होणार आहे. ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग येत्या ३० जूनपासून प्रसारित होणार आहे. देशात गेल्या महिन्यांत नवे सरकार स्थापन होऊन दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

मंगळवारी यासंबंधीचे ट्विट MyGovIndia या ट्विटर हॅंडलवर करण्यात आले आहे. जनतेला उद्देशून यामध्ये म्हटले की, पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा स्विकारल्यानंतर पुन्हा एकदा ‘मन की बात’ सुरु होत आहे. या कार्यक्रमासाठी तुमची माहिती, कल्पना तसेच सूचना पाठवाव्यात, ३० जून २०१९ रोजी प्रसारित होणाऱ्या भागात त्या समाविष्ट होतील.

‘ऑल इंडिया रेडिओ’वरुन अर्थात ‘आकाशवाणी’वरुन दुसऱ्या मालिकेतील हा पहिला भाग प्रसारित केला जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिल्या मालिकेतील शेवटचा भाग प्रसारित झाला होता. मोदींनी त्यावेळी म्हटले होते की, रेडिओवरील हा कार्यक्रम माझ्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव होता.

Leave a Comment