रद्द होऊ शकतो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना


नॉटिंगहॅम – दुखापतींचे ग्रहण तर सध्या चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला लागलेच आहे. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. सतत पावसाचा व्यत्यय इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत येत असल्यामुळे गुरुवारी होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कदाचित रद्द होऊ शकतो.

येत्या गुरुवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नॉटिंगहॅममध्ये होणार आहे. परंतु इंग्लंडमध्ये दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे दोन्ही संघाचे सराव सत्रही कदाचित रद्द होऊ शकतात. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज यांच्यातील सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. पावसामुळे आजचा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामनाही थांबला आहे.

Leave a Comment