बिग बीचे ट्विटर अकाऊंट भेदले, डीपीवर इम्रान खानचा फोटो


बॉलीवूड शेहेनशाह अमिताभ बच्चन उर्फ बिग बी यांचे ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री भेदले गेले असून पाक समर्थक तुर्कस्तानच्या तुर्किश सायबर आर्मी अयील्दीजने हे कृत्य केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हे अकाऊंट भेद्ल्यावर त्यावर तुर्कस्थान आणि पाक संबंधित संदेश पोस्ट करण्यात आले होते तसेच हॅकर्सनी अमिताभ यांच्या अकाऊंटचा प्रोफाईल बायो बदलून तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याच्या फोटो टाकला होता.

या ट्विटरवर अमिताभ यांच्या नावाने ट्विट करताना जगाला जरुरी संदेश दिला होता. आम्ही तुर्की फुटबॉल खेळाडूना आईसलंड रिपब्लिक कडून जी वागणूक दिली त्याची निंदा करतो. आम्ही प्रेमाने बोलतो पण आमच्या हातात मोठी छडी आहे आणि आम्ही येथे एका मोठ्या सायबर हल्ल्यासंदर्भात बोलतोय असे म्हटले होते. तुर्कस्तान फुटबॉल टीम काही दिवसापूर्वी युरो २०२० ची पात्रता फेरी खेळण्यासाठी आयर्लंडला गेली होती तेव्हा विमानतळावर या खेळाडूंची कसून तपासणी केली गेली होती.

अमिताभ ट्विटरवर खूपच सक्रीय असून त्यांचे ३ कोटी ७४ लाख फॉलोअर आहेत. त्यांचे अकाऊंट भेदले गेल्याविषयी बोलताना मुंबई पोलीस जनसंपर्क अधिकारी म्हणाले, सायबर गुन्हे आणि महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाला याची माहिती दिली गेली आहे. भेदले गेल्याच्या थोड्याच वेळात बिग बींचे अकाऊंट त्वरित रिकव्हर केले गेले असून यावरील आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या गेल्या आहेत.

Leave a Comment