या देशात मिळते एक दिवसाच्या लग्नाची परवानगी


आपल्याकडे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशा आशयाची एक म्हण आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध या बातमीशी आहे. पण आजपर्यंत अनेक इच्छुकांची लग्न झाली असतील तर काहीजण लग्नाच्या प्रतिक्षेत असतील. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत. जेथील लग्नाच्या ऑफरची माहिती कळताच तुम्ही त्या देशाला नक्कीच भेट द्याल.

त्या देशाचे नाव नेदरलँड असे असून तेथील अॅम्सर्टडम येथे फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास ऑफर दिली जात आहे. अॅम्सर्टडम पोहोचणारे पर्यटक स्थानिक लोकांशी एक दिवसासाठी लग्न करू शकतात अशी ऑफर आहे. या मागे एक खास कारण आहे. यासाठी अॅम्सर्टडममध्ये ‘Marry An Amsterdammer For The Day’ नावाचा उपक्रम सुरु आहे. हा उपक्रम येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.

याबाबत असे सांगितले जाते की, पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. हेच कारण आहे की, एक दिवसाचे लग्न अॅम्सर्टडमला भेट देणाऱ्या लोकांना करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत या उपक्रमामध्ये हनीमून किंवा डेटवरही जाऊ शकता. पण हा हनीमून हनीमूनसारखा नसतो. यात तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत शहरातील वेगवेगळ्या न पाहिलेल्या भागांमध्ये फिरायला जाता येईल. अॅम्सर्टडमला येणाऱ्या पर्यटकांची संख्या १९ मिलियन आहे. जी पुढील १० वर्षात २९ मिलियनपर्यंत पोहोचेल.

Leave a Comment