चीनने विकसित केली माणसाचा मेंदू वाचणारी चीप


बिजींग- चीनमध्ये नुकताच वर्ल्ड इंटेलिजंस काँग्रेस पार पडले असून मेंदूच्या सुचना वाचणाऱ्या चीपचे प्रदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले. यासंदर्भात वैज्ञानिकांचा दावा आहे की, मनुष्य याद्वारे आपल्या विचाराने स्मार्टफोन नियंत्रित करू शकतो. त्यामुळे ‘ब्रेन टॉकर’ असे नाव या चीपला देण्यात आले आहे. ही चीप आपल्या मेंदुच्या विद्यूत तरंगावर चालणार असून, हे सर्व सिग्नल कॉम्प्यूटरद्वारे डिकोड केले जातील.

या चीपची निर्मिती केलेल्या वैज्ञानिकांनुसार, कंप्यूटर, स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइस या चीपद्वारे नियंत्रित करता येतील. त्यासोबत या चीपचा आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि मनोरंजन क्षेत्रात वापर करण्यात येणार आहे. तियानजिन यूनिव्हर्सिटी आणि चायना इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनने ‘ब्रेन टॉकरला’ संयुक्तपणे मिळून तयार केले आहे. तसेच, कोणत्याही सुचना, बटन किंवा हालचालीशिवाय याद्वारे स्मार्टफोन किंवा कंप्यूटर नियंत्रित केले जाऊ शकते. तसेच, अपंगानाही ही चीप खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण, रूग्णांना आपल्या विचाराने व्हिलचेअर नियंत्रित करता येईल.

याबाबत तियानजिन यूनिव्हर्सिटीचे डीन ‘डॉन्ग मिंग’ यांच्या माहितीनुसार, जर व्यक्तीच्या विचाराने कंप्यूटर नियंत्रित होत असेल तर याचा भविष्यात चांगला परिणाम बघायला मिळेल. ब्रेन टॉकर चीप मेंदू आणि कंप्यूटर दरम्यान एका इंटरफेस टेक्नोलॉजीसारखे काम करेल.

Leave a Comment