युनिक डिझाईनच्या कारमागे स्टाईलपेक्षा सुरक्षेचा केला जातो विचार


आज बाजारात हजारो प्रकारच्या शेकडो कंपन्याच्या विविध कार्स उपलब्ध आहेत. त्यातल्या काही खास युनिक डिझाईनमुळे नेहमी चर्चेत असतात. या युनिक डिझाईनच्या कार्स डिझाईन करताना त्यात काही पार्ट असे असतात कि त्याची नक्की गरज आपल्याला माहित नसते. मात्र कोणतीही कार त्यातही युनिक डिझाईनची कार डिझाईन करताना कारच्या स्टाईल चा विचार असतोच पण त्यापेक्षाही अधिक महत्व सुरक्षेला दिले गेलेले असते.


आपण पाहतो की काही कार्स उंचीला अगदी कमी म्हणजे बुटक्या म्हणता येतील अश्या असतात. मात्र त्यामागेही सुरक्षा हेच कारण असते. या कार वेगाने जात असतानाही पूर्ण स्टेबल राहतात आणि त्यांच्यावर चालकाचा पूर्ण कंट्रोल राहतो. काही कार्सच्या बॉनेट भाग एकदम शार्प असतो. स्पोर्ट्स कार मध्ये असे दिसते. हवा कापून वेगाने पुढे जाण्यासाठी असे डिझाईन उपयुक्त ठरते आणि कार वेगाने चालविणे शक्य होते.


काही कारच्या मागे स्पॉयलर्स म्हणजे विमानाच्या पंखासारखा भाग असतो. या युनिक डिझाईनमुळे अतिवेगाने जात असतानाही कार स्टेबल राहते. असे डिझाईन स्पोर्ट्स आणि सेदान कार्स मध्ये पाहायला मिळते. ग्राउंड क्लीअरन्स अगदी कमी असलेल्या कार्स आपण पाहतो. यात अनेकदा गाडीचा तळ रस्त्याला टेकतो असे वाटते. यातही सुरक्षेचा भाग अधिक असतो कारण वेगाने जात असताना कारच्या खालच्या भागात हवा जादा गेली तर कार उलटण्याची शक्यता असते. रेसिंग कारमध्ये हे डिझाईन पाहायला मिळते.

Leave a Comment