ऑटोमेटिक कार शिकलात तर मिळणार नाही चालक परवाना


पुणे आरटीओने सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला एक निर्णय लवकरच देशभर लागू केला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑटोमेटिक कारवर जर चालक कार ड्रायव्हिंग शिकला असेल तर त्याला चालक परवाना दिला जाणार नाही. पुणे इस्टीटयूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कडून मिळालेल्या माहितीनुसार कार चालक परवान्यासाठी ऑटोमेटिक ट्रान्समिशन कार वर ड्रायव्हिंग शिकून आलेल्या अनेकांना टेस्ट देताना मॅन्यूअल ट्रान्समिशन कार चालविता आली नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या चालकांना कारचालक परवाना न देण्याचा निर्णय घेतला गेला.


आज ऑटो बाजारात ऑटोमेटिक कार्स खूपच मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून या कार्स मध्ये गिअरचे झंझट राहत नाही. त्यामुळे या कार चालविण्यास खूपच सोप्या असतात. परिणामी त्यांना वाढती पसंती आहे. या कार्स आता बजेट किमतीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळेही ग्राहक त्यांना पसंती देत आहेत. पृवी कार चालक परवाना मिळविताना ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण केल्यावर आरटीओ लायसन्स जारी करत असे. पण त्यावेळी फक्त मॅन्यूअल ट्रान्समिशनच्याच कार्स होत्या. आता दोन्ही प्रकारच्या कार्स उपलब्ध आहेत मात्र ऑटो आणि मॅन्यूअल ट्रान्समिशन कार्स अनेक बाबतीत वेगळ्या आहेत.


परिणामी ट्रॅफिक नियमानुसार आणि रस्त्यावर वाढलेली वाहतूक आणि गर्दी लक्षात घेऊन जे कुणी ऑटोमेटिक कार शिकून ड्रायविंग टेस्ट द्यायला येतील त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. याची अंमलबजावणी देशाच्या अन्य भागात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Leave a Comment