मँगो सुपरपॉवर देश इस्रायल


जगभरात अनेक देशात आंबा पिकतो. पण आंब्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश चिमुकला आणि सतत युद्धग्रस्त असलेला इस्रायल हा आहे. चिंचोळ्या पट्टीच्या आकाराच्या या देशाची शस्त्रास्त्र निर्मिती जगभरात वाखाणली गेली आहेच पण या देशाने कृषी क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून भारतासह अनेक देश इस्रायल कडून कृषी सल्ला घेत असतात. या कृषी संशोधनातूनच या देशाने आंबा क्रांती घडविली असून जगात आंबा सुपरपॉवर बनण्याचा विक्रम केला आहे. हा सुप्रसिद्ध आंबा जागतिक बाजारात त्याचे प्रभुत्व गाजवून आहे.


इस्त्रायलमध्ये दरवर्षी ५० हजार टन आंबे उत्पादन होते आणि त्यातील २० हजार टन निर्यात केले जातात. इस्त्रायलने आंबा विकासासाठी खास संशोधन केले असून त्यातील खास आठ जातींचे पेटंट मिळविले आहे. म्हणजे या जातीचे आंबे अन्यत्र उत्पादित करता येत नाहीत. या जाती गरम हवामानातही चांगले उत्पादन देतात. माया, शेली, ओमर, गिलबोआ, नोआ, ताली, ऑरली, आणि टँगो अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे या सर्व जातीच्या आंब्यांची तोड करण्याचे वेळ वेगळी आहे त्यामुळे १५ जून ते डिसेम्बर अखेर आंबा तोड सुरु राहते.


हा आंबा प्रामुख्याने फ्रांस, नेदरलँड्स, गाजा, वेस्ट बँक, रशिया आणि युरोपीय देशात पाठविला जातो. ३० हजार टन आंबा स्थानिक बाजारात विकला जातो. जागतिक बाजारात या आंब्यांना असलेली मागणी लक्षात घेऊन दरवर्षी आंबा लागवडी खालचे क्षेत्र वाढविले जात आहे. येथील कृषी तंत्रामुळे एक हेक्टर मध्ये ३० ते ४० टन आंबा उत्पादन होते. अन्य देशात हे प्रमाण हेक्टरी १० टन इतके आहे.

इस्रायलच्या खास जातीच्या आंब्यांचा जागतिक बाजारात दबदबा आहे. आंब्याच्या पिकाकडे कृषी तज्ञ विशेष लक्ष पुरवितात. जलसिंचन काळजीपूर्वक केले जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आंब्याच्या झाडांवर कोणत्याची रसायनांचा वापर केला जात नाही. यामुळे या आंब्यांना खूप मागणी आहे.

Leave a Comment