दहावीचा निकाल उद्या


पुणे – सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. अखेर आज बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत अफवांवरील पडदा उठवला आहे. बोर्डाने उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल पाहाता येणार आहे. हा निकाल maharashtraeducation.com, mahresult.nic.in, आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

गेल्यावर्षाही ८ जून रोजी दहावीचा निकाल लागला होता. एक मार्च ते २२ मार्चदरम्यान मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र, आता बोर्डाकडून दाहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment