ममता बॅनर्जींचे सारथ्य करणार प्रशांत किशोर


नवी दिल्ली – प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रशांत किशोर काम करणार आहेत.

ममतांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतली आहे. दोघांत पुढील निवडणुकांसाठी तृणमूलसाठी काम करण्याबाबत चर्चा झाली. तृणमूलची प्रतिमा बदलण्याचे काम करण्याबरोबरच पक्षाचे सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर सांभाळणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या आंध्रप्रेदशमधील निवडणुकीत जगनमोहन रेड्डींसाठी काम केले होते. यामध्ये विधानसभेतील १७५ पैकी १५१ जागांवर वायएसआर काँग्रेसने विजय मिळवला होता. तर, लोकसभेतही २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. २०१४ साली नरेंद्र मोदींसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले होते. त्यांना पडद्यामागील घडामोडींसाठी ओळखले जाते. नितीश आणि लालूंसाठीही काम करताना त्यांनी त्यांना निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले होते.

Leave a Comment