डान्स बारमध्ये फक्त बंगाली मुलीच काम करतात – तथागत रॉय


नवी दिल्ली – पुन्हा एकदा मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी बंगालची महान संस्कृती आता लोप पावली असून बंगालमधील मुली आता एक तर झाडू मारतात नाहीत तर मुंबईतील बारमध्ये डान्सर म्हणून काम करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या बाबतीत ट्विटरवर बंगालमधील भाजपच्या एका नेत्याने भूमिका मांडली होती. त्यावर तथागत रॉय ट्विट करत हिंदीचा विरोध करण्याचे काहीच कारण नाही. महाराष्ट्र, ओडीशा, आसाम या गैरहिंदी राज्यात हिंदी भाषेला विरोध झाला नसल्याचे म्हणाले. पण विद्यासागर, विवेकानंद, टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भूमितील मुलींना हिंदी शिकायची काय गरज आहे. दुर्देवाने बंगालची महानताही या महान लोकांसोबतच लोप पावलेली दिसते. कारण, देशात हरियाणापासून ते केरळपर्यंत बंगाली मुली झाडू मारताना दिसतात आणि काही मुली फक्त मुंबईत बार डान्सर म्हणून काम करतात, असे ते म्हणाले.

Leave a Comment