आयसीसीची बीसीसीआयला धोनीच्या ग्लोव्हजवरील ते चिन्ह हटवण्याची विनंती


नवी दिल्ली – आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात ग्लोव्हजवर पॅरा स्पेशल फोर्सच्या चिन्हाचा वापर केला होता.

आयसीसीने धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह हटवण्याबाबत बीसीसीआयला सांगितले आहे. आयसीसीचे महाप्रबंधक क्लेयर फरलाँगने याबाबत बीसीसीआयला कळवताना सांगितले की, धोनीच्या ग्लोव्हजवरी चिन्ह हे बलिदान बिग्रेडचे आहे. फक्त पॅरा मिलिटरीचे कमांडोच हे चिन्ह वापरू शकतात.

आयसीसीच्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यात आयसीसीच्या कपड्यांवर किंवा अन्य कोणत्याही वस्तूंवर राजकारण, धर्म आणि रंगभेदी सारख्या गोष्टींना संदेश देणाऱ्या कोणत्याही चिन्हाचा वा बाबींचा वापर करण्यास मनाई आहे.

पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी धोनीला २०११ साली मिळाली होती. २०१५ साली धोनीने पॅरा बिग्रेडचे प्रशिक्षणही घेतले होते. धोनीने ग्लोव्हजवर लावलेल्या चिन्हाबाबत सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Leave a Comment