४ हजार बौद्ध महिलांची मुस्लीम डॉक्टरकडून नसबंदी


श्रीलंका – ४ हजार बौद्ध महिलांची एका मुस्लीम डॉक्टरने नसबंदी केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त श्रीलंकेतील डिव्हाईन या आघाडीच्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोलंबो या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या नॅशनल तौहीद जमात या दहशतवादी संघटनेचा या प्रकरणातील डॉक्टर हा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सनेही दिले आहे. डिव्हाईन या वृत्तपत्राने २३ मे रोजी पहिल्या पानावर या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते.

या आरोपी डॉक्टरचे डॉ. सेगू शहाबुद्दीन मोहम्मद शफी असे नाव आहे. जे साखळी बॉम्बस्फोट इस्टर संडेच्या दिवशी कोलंबोत झाले ते घडवणाऱ्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या डॉक्टरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ३०० पेक्षा जास्त लोकांचा श्रीलंकेतील साखळी स्फोटात मृत्यू झाला. दरम्यान हे वृत्त आम्ही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवर आणि रूग्णालयांमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिले आहे. त्यांची ओळख आम्ही समोर आणू इच्छित नाही असे डिव्हाईन या वृत्तपत्राचे संपादक अनुरा सोलोमन्स यांनी रॉयटर्सला सांगितले आहे.

पोलिसांनी डॉक्टर सेगू शहाबुद्दीन शफी या डॉक्टरला अटक केली आहे. पण पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. या डॉक्टरने नसबंदी प्रकरणाबाबत माहिती देण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी रॉयटर्सला सांगितले आहे. कुरुनेगला या ठिकाणी असलेल्या रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर त्यांची संमती न घेत या डॉक्टरने गुपचूप नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान हे वृत्त समोर आल्याने श्रीलंकेत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

Leave a Comment