भारताची बॉक्सिंग क्वीन मेरी कोम सन्यास घेणार


आगामी टोक्यो ऑलिम्पिक २०२० नंतर भारताची मुष्टियुद्ध राणी आणि ६ वेळा वर्ल्ड चँपियनशिप मिळवून देऊन देशाचा डंका जगात वाजविणारी मणिपूरची मेरी कोम निवृत्तीचा विचार करत आहे. या मणिपुरी बॉक्सरने गुरुवारी बोलताना तिचे मुख्य लक्ष्य सध्यातरी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच असल्याचे सांगताना त्यानंतर कदाचित खेळाला अलविदा करण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

३६ वर्षीय मेरी म्हणाली, सुरवातीपासून आत्तापर्यंत मी सतत बॉक्सिंग रिंग मध्ये लढतेय. आता खूप युंवा खेळाडू या क्षेत्रात येत आहेत आणि चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यातून आपल्याला लवकरच आणखी एक मेरी कोम मिळेल अशी अशा आणि इच्छा आहे. ३६ वर्षीय मेरी म्हणाली, सामना जिंकल्यावर जेव्हा आपल्या देशाचा ध्वज वर चढतो तो क्षण फार भावूक करणारा असतो.


वर्ल्ड चँपियन बॉक्सिंग मध्ये मेरीने ६ गोल्ड, १ सिल्व्हर अशी कमाई केली असून गेली १६-१७ वर्षे ती बॉक्सिंग रिंग मध्ये लढते आहे. मेरी ४८ किलो वजनी गटात खेळते आणि याच गटात तिने बहुतेक मेडल जिंकली आहेत. मात्र ऑलिम्पिक मध्ये ४८ किलो वजनगट श्रेणी नाही त्यामुळे तिला ५१ किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे. त्याचा थोडा त्रास होतो असे ती सांगते. अर्थात तिने २०१२ लंडन ऑलिम्पिक मध्ये याच गटात खेळून ब्राँझ तर २०१९ इंडिया ओव्हर मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.

मेरी सांगते ५१ किलो गटात खेळावे लागले तरी तेथे माझा इतक्या वर्षांचा अनुभव उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो. मी तयारी सुरु केली आहे आणि पूर्ण क्षमतेने खेळणार आहे.

Leave a Comment