चला हवा येऊ द्याच्या मंचावर अवतरणार 'पांडू' - Majha Paper

चला हवा येऊ द्याच्या मंचावर अवतरणार ‘पांडू’


रात्रीस खेळ चाले या मालिकेतील ‘इसरलंय, ‘त्या मला काय माहित?’, हे संवाद ज्याच्यामुळे संवाद लोकप्रिय झाले आहेत, त्या पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले होते. हाच ‘पांडू’ म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतडकर आता कॉमेडीच्या मंचावर एन्ट्री करणार आहे. प्रल्हाद ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये सर्वांना हसवताना दिसणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस या कार्यक्रमाचे ‘शेलिब्रिटी पॅटर्न’ हे नवीन पर्व आले आहे. प्रेक्षकांचे लाडके कलाकार या पर्वात कॉमेडी करून त्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. आता पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकरची या पर्वात एंट्री होणार आहे. प्रेक्षकांना प्रल्हादची ‘पांडू’ ही व्यक्तिरेखा हसवते. पण आता ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांचे किती मनोरंजन करेल हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.

Leave a Comment