आठ कॅबिनेट समित्यांचे अमित शहा आणि पंतप्रधान मोदी सदस्य


नवी दिल्ली – आठ कॅबिनेट समित्यांची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचाही या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्वच समित्यांचे अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे सदस्य असणार आहेत.

या समित्यांची स्थापना केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समिती, सुरक्षा समिती, राजकीय कामकाज समिती, आर्थिक कामकाज समिती, संसदीय कामकाज समिती, निवासी कामकाज समिती, गुंतवणूक समिती, रोजगार तथा कौशल्य विकास समिती इत्यादी समित्यांचा यात समावेश आहे. मोदींनी या ८ समित्यांपैकी ६ समित्यांचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवलेले आहे. तर या सर्व ८ समित्यांचे गृहमंत्री अमित शहा हे सदस्य आहेत.

Leave a Comment