असे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त विधानांनी आणि निर्णयांनी नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांचे खरे व्यक्तिमत्व कसे आहे हे अजून समोर आलेले नाही. त्यांना त्यांच्या देशाचे म्हणजे अमेरिकेचे फार प्रेम आहे आणि अमेरिकेच्या हिताचा कोणताही निर्णय घेण्यास ते नेहमी तयार असतात असे सांगितले जाते. ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचे वडीलही मोठे उद्योजक होते आणि डोनाल्ड यांचे सारे आयुष्य श्रीमंतीत गेले आहे.


असे असले तरी जगभरातील उद्योजक आणि बाजार क्षेत्राला ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष व्हावेत अशी अजिबात इच्छा नव्हती. ट्रम्प दहशतवादाच्या विरोधात आहेत. त्यांना वारंवार हात स्वच्छ करण्याची सवय आहे आणि त्यामुळे ते कुणाशीही हस्तांदोलन करत नाहीत. ट्रम्प दारू अथवा मादक पदार्थांचे सेवन कधीच करत नसले तरी त्यांनी स्वतःच्या नावाचा एक व्होडका ब्रांड लाँच केला आहे. अमेरिकेत ट्रम्प नावाचा एक प्रसिद्ध गेम असून तो त्यांच्याच मालकीचा आहे.


१९९१ साली डोनाल्ड ट्रम्प कर्जात बुडाले होते. त्यांना त्याचे पैसे काळ्या माणसांनी मोजलेले आवडत नाही मात्र पुढील जन्मात त्यांना निग्रो म्हणून जन्माला यावे अशी इच्छा आहे. आपण कधीच एटीएम वापरत नाही असा त्यांचा दावा आहे. ट्रम्प सध्या स्थलांतरित लोकांच्या विरोधात असले तरी त्यांनी ट्रम्प टॉवर्स बांधताना अवैध मजुरांकडूनच काम करून घेतले होते आणि एक इमारत बेकायदा बांधली होती असे सांगतात.


ट्रम्प यांना स्कॉटलंड विद्यापीठाने यशस्वी उद्योजक म्हणून पदवी दिली होती आणि नंतर ती काढून घेतली. ट्रम्प यांनी त्यांच्या वडिलांना माकड म्हणणाऱ्या बिल मोहर या व्यक्तीवर न्यायालयात दावा दाखल केला होता. ट्रम्प पिझ्झा खातानाही काटा आणि सुरी वापरतात. लहानपणी ते खोडकर होते म्हणून वडिलांनी त्यांना सैनिक शाळेत दाखल केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक रेसलिंग स्पर्धात होस्ट म्हणून काम केले आहे.

Leave a Comment