बेबीमूनची धूम

हनीमून शब्द आपल्या चांगलाच परिचयाचा झाला आहे . लग्नानंतर पतीपत्नी मिळून एखाद्या सुंदर स्थळी एकमेकांना समजून घेण्यासाठी हनीमूनला जातात. आजकाल मात्र बेबीमूनचीही अशीच क्रेझ आली आहे. बेबीमून म्हणजे बाळ जन्माला येण्याअगोदर गरोदर पत्नीला आवडत्या ठिकाणी नेऊन पतीराज तिच्याबरोबर चांगला वेळ व्यतीत करतात. दोघांच्याही आवडत्या ठिकाणाची निवड केली जाते आणि तेथे गेल्यानंतर आपल्या बाळाच्या भविष्याविषयी, येणार्‍या जबाबदार्‍यांविषयी पती पत्नी एकमेकांची मते समजून घेतात.

बेबीमूनची सुरवात झाली ९० व्या शतकात. मात्र त्यावेळी बाळ झाल्यानंतर नवजात अर्भकासह निवांत ठिकाणी जाऊन राहणे असा त्याचा अर्थ होता.  २००६ सालापासून मात्र बाळाच्या जन्माअगोदरच बेबीमून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यासाठी निवांत समुद्र किनारे असलेली ठिकाणे, थंड हवेची ठिकाणे अथवा एखादे आवडते शहर निवडले जाते. बेबीमूनसाठी गरोदरपणातले १८ ते २४ आठवडे हा काळ सर्वात चांगला समजला जातो.

बेबीमूनसाठी सर्वसाधारण पर्यटनाला जाताना करतो तशी व्यवस्था करून चालत नाही. तर कोणतही आणीबाणी येऊ शकते असे लक्षात घेऊन त्वरीत उपचार मिळतील असे ठिकाण निवडावे लागते. विमानाने जाणार असल्यास संबंधित विमान कंपनी गरोदर महिलेला प्रवास करून देते की नाही याची माहिती घ्यावी लागते कारण अनेक विमान कंपन्या गरोदर महिलांना विमानात प्रवास करू देत नाहीत. कार ने जायचे असल्यास जवळचे अंतर घेणे सोयीस्कर असतेच पण प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय बेबीमून चा कार्यक्रम ठरविणे योग्य नसते.

Leave a Comment