गृह मंत्रालयाने जाहिर केली सर्वात धोकादायक १० दहशतवाद्यांची यादी


नवी दिल्ली – अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेसोबत बैठक बोलावली. काश्मीरच्या राज्यपालांसोबतही त्यांनी यावेळी चर्चा केल्यानंतर काश्मीरमधील सर्वात धोकादायक 10 दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना सांगण्यात आले आहे.

काश्मीरच्या विविध जिल्ह्यात काम करणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीन, लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल बदर यांच्यातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांच्या नावांचा एमएचएद्वारे सुरक्षा दलाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. रियाज नाइकू, ओसामा आणि अशरफ मौलवी यांचाही यामध्ये समावेश आहे.

गृहमंत्रालयाकडून जाहिर धोकादायक 10 दहशतवाद्यांची यादी
1. रियाज नाइकू उर्फ ​मोहम्मद बिन कासिम – A ++ श्रेणी उग्रवादी, 2010 पासून दहशतवादी कारवायांत समावेश
2. वसीम अहमद उर्फ ओसामा – लश्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर
3. मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी – हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधीत दहशतवादी, अनंतनागमध्ये सक्रिय
4. मेहराजुद्दीन – बारामूल्लामध्ये हिजबुल मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर
5. डॉ. सैफुल्ला उर्फ सैफुल्लाह मीर उर्फ डॉ सैफ – श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनला वाढवण्याचा प्रयत्न
6. अरशद उल हक – पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिदीनच जिल्हा कमांडर, ए ++ श्रेणीचा दहशतवादी
7. हाफिज उमर – जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर, पाकिस्तानचा राहिवासी
8. जहीद शेख उर्फ उमर अफगानी – जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी, अफगानिस्तानमध्ये नाटो सेना सोबत लढाई
9. जावेद मट्टू उर्फ फैसल उर्फ शाकिब उर्फ मुसाब – अल-बदरचा दहशतवादी, उत्तर काश्मीरमध्ये अल बदरचा डिव्हीजनल कमांडर
10. एजाज अहमद मलिक

Leave a Comment