सॅमसंगने सुरु केली ६ जी नेटवर्कची तयारी


दक्षिण कोरियातील जायंट टेक्नोलॉजी कंपनी सॅमसंगने जगभरात ५ जी सेवा पूर्णपणाने सुरु होण्याअगोदरच ६ जी सेवेची तयारी सुरु केली असून सेओल येथे ६ जी मोबाईल नेटवर्क विकासासाठी नवीन रिसर्च सेंटर स्थापन केले आहे. सॅमसंगमधील वरिष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले, या केंद्रात डेव्हलपमेंट फर्म आणि सॅमसंग रिसर्च अॅडव्हान्स सेल्युलर तंत्र विकासासाठी काम करणार आहे. त्यासाठी नव्याने संशोधकांची टीम स्थापन करण्यात आली आहे.

जगात अजूनही ४ जी नेटवर्क प्रामुख्याने वापरले जात असून ते संवाद दळणवळणाचे मुख्य तंत्रज्ञान आहे. कोरियन मिडीयाने दिलेल्या बातमीनुसार जगाच्या काही देशातच ५ जी सेवा रोल आउट झाली आहे. मात्र अजून ती प्रारंभिक पातळीवरच आहे. अशा परिस्थितीत ६ जी तंत्रज्ञानावर काम सुरु करणे हे कंपनीच्या दूरदर्शी तंत्रज्ञान व्यवसायाचा एक भाग मानला पाहिजे.


सॅमसंगने जगातला पहिला ५ जी स्मार्टफोन गॅलेक्सी एस १० फाइव्ह जी नावाने एप्रिल मध्ये लाँच केला आहे. हे तंत्रज्ञान सेल्फ ड्रायव्हिंग वाहने, छोटे कारखाने, इंटरनेट ऑफ थिंग्स यासाठी वापरता येणार आहे. सॅमसंग बरोबर आणखी काही तंत्रज्ञान कंपन्या फ्युचर मोबाईल टेक्नॉलॉजीवर काम करत असून त्यांचा मुख्य उद्देश अमेरिकेच्या अगोदर ६ जी नेटवर्क लाँच करणे हा आहे. कोरीयाच्याच एलजी इलेक्ट्रोनिकने कोरिया अॅडव्हान्स्ड इंस्टीटयूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व द. कोरियाची दोन नंबरची टेलिकॉम कंपनी केटी कॉर्प बरोबर ६ जी नेटवर्क साठी भागीदारी केली आहे.

६ जी नेटवर्कचचा मुख्य उद्देश सॅटेलाइत इंटिग्रेट करून ग्लोबल कव्हरेज देणे हा आहे. यामुळे हाय डेटा रेटवर युजर ५ जी पेक्षा अधिक वेग मिळवू शकणार आहेत.

Leave a Comment