संघाच्या प्रदर्शनावर शाकिबने केले ‘हे’ वक्तव्य


लंडन – बांगलादेशने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर धक्कादायक मात करत स्पर्धेतील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने या सामन्यात ७५ धावांची उपयुक्त खेळी करत सामनावीराचा मान पटकावला. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना एक बळीसुद्धा घेतला. शाकिबने सामना संपल्यावर संघाच्या प्रदर्शनावर भाष्य केले.

संघाची यापेक्षा चांगली सुरुवात असुच शकत नाही. अशीच सुरुवात आम्हाला अपेक्षित असल्यामुळेच हा विजय आम्ही मिळवलेल्या चांगल्या विजयांपैकी एक असल्याचे शाकिबने म्हटले आहे. शाकिब पुढे म्हणाला, इंग्लंडला आम्ही पूर्ण आत्मविश्वास घेऊन आलो आहोत. ड्रेसिंग रुममधील वातावरण या विजयानंतर चांगले आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. मी २ वर्ष वॉर्कशायरबरोबर खेळलो असल्याने मला त्याचा फायदा झाला. आमचा आत्मविश्वास या विजयामुळे वाढला असून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात आम्ही संपूर्ण तयारीनिशी उतरू.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान दिले होते. किंग्जस्टन ओव्हल, लंडन येथे रंगलेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवला आहे.

Leave a Comment