१० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून ! - Majha Paper

१० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून !


मुंबई – ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज असून ६ जूनपर्यंत मान्सून जर केरळमध्ये आला तर १० तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.

याबाबत त्या म्हणाल्या, अरबी समुद्रात येत्या ३ दिवसात मान्सूनचे ढग अधिक जलद गतीने तयार होतील. त्यानंतर ६ जूनपर्यंत केरळमध्ये तर १० जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण पट्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. २-३ दिवस मुंबईतसुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना पावसासाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. अरबी समुद्रात मान्सून हा सक्रिय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. पण असे असले तरी महाराष्ट्रात मान्सून येण्यास अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जोपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मान्सून कधी होणार हे सांगता येणार नाही, असेही भुत्ते यांनी सांगितले.

Leave a Comment