भारताचे पंतप्रधानपद भूषविण्याची पीसीची इच्छा


अमेरिकन पॉपस्टार निक जोनास याच्याबरोबर विवाह गाठ बांधून अमेरिकेच्या आश्रयाला गेलेली बॉलीवूड क़्विन प्रियांका चोप्रा उर्फ पीसी देशाला विसरलेली नाही. कारण भविष्यात आपण भारताचे पंतप्रधानपद भूषवू इच्छितो अशी मनीषा तिने एका मुलाखतीत नुकतीच व्यक्त केली आहे. पीपल्स डॉट कॉमनुसार या क्वान्टिगो अभिनेत्रीने द संडे टाईम्सला मुलाखत देताना ही इच्छा व्यक्त केली आहे. पीसी म्हणते, भविष्यात ती राजकारणात येऊ शकते.

आज बॉलीवूड मधील अनेक कलाकार राजकारणात चांगले यशस्वी झाले आहेत. मात्र पीसीला त्यांच्याप्रमाणे नुसते खासदार किंवा मंत्रीपदावर समाधान मानायचे नाही तर तिला पंतप्रधान व्हायचे आहे. ती म्हणते राजकारणाशी आज ज्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत त्या तिला आवडत नाहीत पण ती आणि पती निक जोनास यांना खरोखर काही बदल घडवून आणावा असे वाटते. यामुळे पीसी भारताची पंतप्रधान बनू इच्छिते तर निक ने अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक लढवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनावे असेही तिला वाटते. पीसीच्या मते निक महान नेता बनू शकतो कारण तो नारीवादी शब्दांचा वापर करताना अजिबात घाबरत नाही आणि त्याचा हा गुण तिला फार पसंत आहे.

अर्थात इतक्या लवकर पीसी राजकारणात येऊ इच्छित नाही कारण ती अजून मनोरंजन क्षेत्रात खूप काही करू शकते. मात्र या क्षेत्रातून निवृत्ती घेताना ती राजकारणाचा विचार करणार आहे. सध्या ती स्काय इज पिंक या चित्रपटात काम करते आहे आणि या भूमिकेसाठी खूप मेहनत घेते आहे.

Leave a Comment