विधानसभेसाठी युतीचा असा असेल फॉर्म्युला


मुंबई – सेना-भाजपच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी एकमेकांवर चिखलफेक केल्यामुळे त्यांची युती लोकसभा निवडणुकीत होणार नाही, हे चित्र जवळपास स्पष्ट होते. पण सरतेशेवटी लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपमध्ये युती झाली. त्यावेळी २३-२५ असा फॉर्म्युला ठरला होता. त्यामध्ये २३ जागा सेनेला, तर २५ जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सेना-युतीचा फॉर्म्युला ठरला असून २८८ जागांपैकी १३५ जागांवर भाजप, तर १३५ जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. तर घटक पक्षांना उर्वरीत जागा देण्यात येईल, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान एकेकाळी राज्यात युतीत जास्त जागा घेणाऱ्या शिवसेनेला आता भाजपने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवावी लागत आहे. विधानसभेच्या राज्यात २८८ जागा असून त्यामध्ये १८ जागा घटक पक्षांना, तर सेना-भाजप १३५-१३५ जागांवर निवडणूक लढवणार आहे, असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पराभव हा शिवसेनेच्या आमदाराने केल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Leave a Comment