टीम इंडियासाठी भगव्या रंगाची अल्टरनेट जर्सी


टीम इंडियाचे चाहते विराट आणि कंपनी वर्ल्ड कप मध्ये काय कामगिरी करतात याकडे नजर लावून बसले असतानाच टीम इंडियासाठी आयसीसीच्या नव्या नियमानुसार भगव्या रंगाची अल्टरनेट जर्सी लाँच केली गेली असल्याचे समजते. या जर्सीच्या रिअर साईडचे फोटो जारी झाले असून इंग्लंडच्या वेल्श येथे खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कप सामन्यात काही निवडक प्रसंगी टीम इंडिया ही जर्सी घालून खेळताना दिसणार आहे.

नव्या नियमानुसार एकाच रंगाच्या जर्सी विविध टीम वापरत असतील तर यजमान टीम त्यांच्या मूळ रंगाच्या जर्सीत खेळातील तर पाहुण्या टीमला वेगळ्या रंगाची जर्सी घालावी लागेल. टीम इंडिया, इंग्लंड, श्रीलंका आणि अफगानिस्तान टीम निळ्या रंगाची जर्सी वापरतात. नव्या नियमानुसार एकमेकाविरोधात खेळत असलेल्या सामन्यात दोन्ही टीमची किट वेगळ्या रंगाची असणे बंधनकारक केले गेले आहे.
त्यामुळे इंग्लंड आणि अफगाणिस्थान विरोधांत खेळताना टीम इंडिया पाहुणी टीम म्हणून खेळेल तेव्हा त्यांना भगवी जर्सी वापरावी लागेल तर श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला यजमान टीमचा दर्जा दिला गेला असल्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्यांना निळी जर्सी वापरता येणार आहे. भगवी जर्सी टीम इंडियासाठी अवे जर्सी नाही तर अल्टरनेट जर्सी आहे असा खुलासा केला गेला आहे.

Leave a Comment