ट्रेनच्या मागे का असते असे चिन्ह ?


आपण लहानपणापासून आतापर्यंत अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल आणि अजूनही करत असाल. ट्रेनच्या प्रवासा दरम्यान आपण अनेकदा आत आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह पाहिली असतील. यातील एक महत्त्वाचे चिन्ह म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेले X हे चिन्ह. अनेकदा हा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल की, नेमका या X चा काय अर्थ असावा?

पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हे चिन्ह भारतात चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या मागे काढलेले असते. हे चिन्ह सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणे गरजेचे आहे. भारतीय रेल्वेनेच हा नियम केला आहे. तुम्ही यासोबतच हे देखील पाहिले असेल की, एलव्ही असेही काही ट्रेनवर लिहिले असते. सोबतच ट्रेनच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतात.

एलव्ही ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर लिहिण्याचा अर्थ असा की, ट्रेनचा हा डबा शेवटचा डबा आहे. नेहमी X या साइनने हा एलव्ही लिहिला जातो. प्रत्येक ट्रेनच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असे लिहिलेले नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपातकालिन स्थितीत आहे.

तसेच ट्रेनच्या मागे जळत असलेला लाल लाइट हा ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देश असतो की, ट्रेन त्या ठिकाणाहून पास झाली आहे, जिथे ते काम करत होते. हा लाइट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाइटने मागून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा इशारा मिळतो.

Leave a Comment