महात्मा गांधीवरून आयएएस अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य


मुंबई : आपल्याला महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवे. जगभरातील त्यांचे पुतळे हटवायला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य एका महिला आयएएस अधिकाऱ्याने केले आहे. या महिला अधिकाऱ्याचे नाव निधी चौधरी असे असून त्यांची सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्ती करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

निधी यांनी गांधींची 150 वी जयंती साजरी करण्यामागे काय अपेक्षा असू शकते. गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्याचा आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्याची हीच योग्य वेळ आहे. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे 30. 01.1948 साठी, अशी आशयाचे ट्वीट केले होते.

ट्विटच्या शेवटी गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचे त्याने 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्या केल्याबद्दल निधी यांनी आभार देखील मानले आहेत. त्यामुळे अनेकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. या ट्विटचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला आहे. तसेच निधी यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment