कार्लमन किंग- जगातली महागडी एसयुव्ही


युनिक आकाराची आणि अनेक हायटेक वैशिष्टे असलेली एसयूव्ही लाँच केली गेली असून या एसयूव्हीचे वजन आणि किंमत दोन्हीही चांगलीच भारी आहे. कार्लमन किंग असे तिचे नामकरण केले गेले आहे. फोर्ड कमर्शियल ट्रक बेसवर ती तयार झाली असून चीनी कंपनीने तिचे डिझाईन केले आहे. या एसयुव्हीचे डिझाईन डायमंड कटशेपचे असून ती चार सीटर आहे. ही एसयूव्ही म्हणजे चालते फिरते घर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या कारचे वजन ६ टन असून तिची किंमत आहे १३ कोटी रुपये. फ्रंटलुक मस्क्युलर आहे आणि ही कार रुंदीला ८ फुट २ इंच आहे. या कारची फक्त १२ युनिट बनविली गेली आहेत. कारचे इंटिरियर बहारदार आहेच शिवाय प्रायव्हेट सेप्स, वाईड स्क्रीन टीव्ही, फ्रीज, कॉफीमेकर, प्लेस्टेशन ४ गेमिंग सिस्टीम दिली गेली आहे. ही एसयूव्ही बुलेटप्रुफ आहेच पण ती कस्टमाईज करून घेता येणार आहे. या एसयूव्हीला ६.८ लिटर चे व्ही १० इंजिन दिले गेले असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी १४० किमी. हि गाडी गर्दीत नेणे इतके सोपे नाही. मागणीनुसार या एसयूव्हीला ६ दरवाजे करता येणार आहेत.

Leave a Comment