तुमच्या निधनानंतर असे डिलीट होईल तुमचे गुगल अकाऊंट


आपण सध्याच्या घडीला डिजीटल युगात वावरत असल्यामुळे आपली बरीचशी माहिती जीमेलमुळे त्यांच्या सर्व्हरवर जमा होत असते. पण आपल्या निधनानंतर त्या जीमेल खात्याचे काय होते किंवा काय होईल? तर युजर्सच्या मदतीसाठी सातत्याने विविध फिचर्स आणि सुविधा देणारे जीमेल निधनानंतर तुमच्या खात्याचे नेमकं काय करणार? याची चिंता तुम्ही करु नका. कारण तुमचे जीमेल अकाऊंट मृत्यूनंतर आपोआप डिलिट करण्याची सुविधा जीमेलने उपलब्ध करुन दिली आहे. तुम्हाला त्यासाठी विशिष्ट सेटिंग फक्त करावी लागेल.

त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम myaccount.google.com या लिंक वर जावे लागेल. त्यानंतर Data & personalization या पर्यायावर क्लिक करावा लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा. त्या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जीमेल अकाऊंट डिलिट करण्यासाठी अजून एक पर्याय दिसेल. त्याद्वारे अकाऊंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनीकडून ते डिलिट होईल, हे तुम्ही ठरवू शकता. Start ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इनअॅक्टीव्ह मॅनेजरचे पेज दिसेल. तुम्हाला 3, 6, 12 आणि 18 महिने असे 4 पर्याय त्यात उपलब्ध असतील. तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय तुम्ही निवडू शकता.

कंपनीकडून ते तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तितका वेळ अकाऊंट बंद असल्यास डिलिट केले जाईल. पण तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर SMS किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क करण्यात येतो व त्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर तुमच्या जवळच्या 10 व्यक्तींची नावे तुम्ही त्यात समाविष्ट करु शकता. ज्यामुळे तुमचे जीमेल अकाउंट डिलिट केल्याचे नोटिफिकेशन त्या 10 व्यक्तींना मिळेल. तसेच ऑटो रिप्लाय हा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता. तुम्ही हे अकाऊंट यामुळे वापरत नसल्याचा मेसेज आपोआप तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीला जाईल.

Leave a Comment