नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून ‘या’ जुन्या चेहऱ्यांना मिळाला डच्चू


नवी दिल्ली – काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रागंणात १७ व्या लोकसभेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. ५८ खासदारांनी यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ मध्ये मंत्री असलेल्या अनेक मंत्र्यांना या मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आला आहे. तर अनेक नव्या चेहऱ्यांना यात संधी देण्यात आली आहे.

यावेळी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजपचे नेते सुरेश प्रभू यांना स्थान देण्यात आले नाही. प्रभू यांना २०१४ च्या लोकसभेत प्रथम रेल्वे मंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पदाचा कारभार त्यांच्यावर सोपवण्यात आला होता. पण यंदा त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे.

मेनका गांधी यांच्याकडे २०१४ च्या मंत्रिमंडळात महिला आणि बाल विकास मंत्रीपदाचा कारभार होता. पण त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. गेल्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांना यावेळी मंत्रीमंडळात संधी देण्यात आली नाही.

यावेळी मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघातून निवडूण आलेले डॉ. सुभाष भामरे यांनाही संधी देण्यात आली नाही. त्यांच्यावर गेल्या मंत्रीमंडळात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपावण्यात आली होती. २०१४ च्या लोकसभेत सत्यपाल सिंग यांना केद्रींय राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळातून त्यांना डावलण्यात आले आहे.

यावेळच्या मंत्रीमंडळात राधामोहन सिंह यांनाही संधी देण्यात आली नाही. राधामोहन सिंग यांच्याकडे २०१४ च्या मंत्रिमंडळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाची जबाबदारी सोपावण्यात आली होती. यावेळी अनंत हेडगे यांनाही मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. ते २०१४ च्या मंत्रिमंडळात केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री होते. यावेळीच्या मंत्रिमंडळातून राज्यवर्धनसिंह राठोड यांनाही डच्चू देम्यात आला आहे. त्यांच्याकडे २०१४ च्या मंत्रीमंडळात केंद्रीय क्रिडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Leave a Comment