देव तारी त्याला कोण मारी !

accident
विमानाचा प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो, पण गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक विमान अपघात होऊन गेले, ज्यामध्ये अपघातग्रस्त विमानांतील प्रवाश्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्राणांना मुकावे लागले. मात्र काही विमान अपघात असे ही घडले, जे घडल्यानंतर त्यातील प्रवासी सुखरूप असण्याची कोणतीही शक्यता नसताना, सर्व प्रवासी सुखरूप बचावले. हे अपघात आणि त्यातून सुखरूप बचावलेल्या प्रवाश्यांच्या बाबतीत, देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही.
accident1
मेक्सिको येथील तुरंगो शहराच्या जवळ एरोमेक्सिकोचे एक प्रवासी विमान अगदी अलीकडच्या काळामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानामध्ये चालकदलासहित १०१ प्रवासी होते. पण विमान दुर्घटनाग्रस्त होऊनही सर्व प्रवासी सुखरूप बचावले. १५ जानेवारी २००९ रोजी १४६ प्रवासी आणि चालकदल घेऊन जात असलेले अमेरिकन एअरलाईन्सचे विमान न्यू यॉर्कच्या ला गार्डीया विमानतळावरून नॉर्थ करोलाईनाला जात असताना विमानाची दोन्ही इंजिने ‘बर्ड हिट’ मुळे निकामी झाली. त्यावेळी विमानाचे कप्तान असलेले सलेनबर्ग यांनी विमान हडसन नदीवर उतरविण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला, आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेवर आधारित ‘सली’ नामक चित्रपटामध्ये हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स यांनी सलेनबर्ग याची भूमिका केली आहे.
accident2
एअर फ्रान्सचे ए ३२० विमान २९७ प्रवासी आणि बारा कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवास करीत असताना लँडिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये एक इंजिन खराब झाल्याने धावपट्टीवर जोराने येऊन आदळले. त्यावेळी भयंकर पाऊसही पडत होता. पण तश्याही परिस्थितीमध्ये वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले. कॉन्टीनेन्टल एअरलाईन्स चे बोईंग ७३७ हे विमान अमेरिकेतील डेन्व्हर विमानतळावरून उड्डाण करीत असताना, त्यावेळी वारे अतिशय वेगाने वाहत असल्याने हे विमान धावपत्त वरच क्रॅश झाले. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.