वर्ल्ड कप टीम – श्रीलंका


१९७५ पासुन विश्वचषकाचा भाग असलेल्या श्रीलंकेला १९७५ ते १९९२ च्या विश्वचषकात तितकीशी सरस कामगिरी करता आली नाही. पहिल्या विश्वचषकात विजयापासुन दुर राहिलेल्या श्रीलंकेनी १९७९ च्या विश्वचषकात भारताचा पराभव करत विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवला. त्यानंतरच्या पुढील ३ विश्वचषकात श्रीलंकेला हवी तशी कामगिरी करता आली नाही पण १९९६ मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या विश्वचषकात अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेनी सगळ्याच संघांना धक्का देत ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यांत पराभव करत पहिल्या विश्वचषकावर कब्जा करत क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आणि त्यानंतर २००७ व २०११ साली श्रीलंकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कुमार संगकारा, महेला जयवर्धने व दिलशान तिलकरत्नेच्या निवृत्ती नंतर श्रीलंकेची कामगिरी खालावली आहे. २०१५ च्या विश्वचषकानंतर श्रीलंकेनी संघात अनेक बदल केले पण त्याचा त्यांच्या कामगिरीवर काही फरक पडला नाही. आता २०१९ च्या विश्वचषकासाठी श्रीलंकेनी दिमुथ करुणारत्नेची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे त्यामुळे तो संघाचे नेतृत्व करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाचे खेळाडु:- अॅजेलो मॅथ्युज, लसिथ मलिंगा, कुसल मेंडीस, कुसल परेरा
आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ९
विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९९६ मध्ये विजेतेपद
यशस्वी कर्णधार अर्जुन रणतुंगा (१९९६)
संघाच्या सर्वाधिक धावा ३९८/५ वि. केनिया (१९९६)
निच्चांकी धावसंख्या ८६ वि. वेस्ट इंडिज (१९७५)
सर्वाधिक धावा कुमार संगकारा – १५३२ (२००३ – २०१५)
सर्वोच्च धावा तिलकरत्ने दिलशान – नाबाद १६१ वि. बांग्लादेश (२०१५)
सर्वाधिक शतक कुमार संगकारा – ५
सर्वाधिक सरासरी कुमार संगकारा – ५६.७४
सर्वाधिक मोठी भागिदारी उपुल तरंगा व तिलकरत्ने दिलशान – २८२ वि. झिम्बाब्वे (२०११)
सर्वाधिक बळी मुथय्या मुरलीधरन – ६८ बळी
सर्वाधिक झेल सनथ जयसुर्या – १८ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत कुमार संगकारा – ५४ बळी (झेल ४१ यष्टिचीत १३)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण चमिंडा वास – ६/२५ वि. बांग्लादेश (२००३)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा महेला जयवर्धने (२००७) – ५४८ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी चमिंडा वास (२००३) – २३ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल महेला जयवर्धने (२०११) – ८ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत कुमार संगकारा (२००३) – १७ बळी (झेल १५ यष्टिचीत २)

संघ:- दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अॅजेलो मॅथ्युज, लसिथ मलिंगा, कुसल मेंडीस, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, नुवान प्रदिप, अविश्का फर्नांडो, सुरंगा लकमल, जिवन मेंडीस, थिसरा परेरा, मिलिंदा शिरिवर्धना, लहिरु थिरिमाने, इसरु उदाना, जेफ्री वंडर्सी
१ जुन २०१९ वि. न्युझिलंड दु. ३.००
४ जुन २०१९ वि. अफगाणिस्तान दु. ३.००
७ जुन २०१९ वि. पाकिस्तान दु. ३.००
११ जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
१५ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया दु. ३.००
२१ जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
२८ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
१ जुलै २०१९ वि. वेस्ट इंडिज दु. ३.००
६ जुलै २०१९ वि. भारत दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment