वर्ल्ड कप टीम –वेस्ट इंडिज


क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने १९७५ व १९७९ च्या पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद तर १९८३ च्या विश्वचषकात उपविजेतेपद जिंकलेल्या वेस्ट इंडिजने क्रिकेट विश्वावर आपला दबदबा सिद्ध केला. क्लाईव्ह लॉईड, व्हिव रिचर्डस, सर अॅडी रॉबर्टस, लान्स गिब्स, अॅल्वियन कालिचरण, रोहन कन्हाय यांसारख्या तगड्या खेळांडुंनी आपल्या संघाला दोनदा विश्वविजेतेपद मिळवुन दिले. पण पुढच्या आठ विश्वचषकात १९९६ चा विश्वचषक वगळता संघ उपांत्य फेरी पर्यंत पोहचु शकला नाही. वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकात देखिल संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. मागील अनेक वर्षांपासुन वेस्ट इंडिजची एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी खालावली आहे. २०१९ च्या विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी पात्रता स्पर्धा खेळावी लागली त्यात वेस्ट इंडिजने उपविजेते पटकावत २०१९ च्या विश्वचषकात प्रवेश मिळवला. पण मागच्या एका वर्षातील वेस्ट इंडिजच्या युवा खेळाडुंनी संघाला शानदार विजय मिळवुन दिले आणि तश्याच कामगिरीची अपेक्षा शिमरॉन हेटमायर, शाय होप्स, निकोल्स पुरन यांसारख्या युवा व ख्रिस गेल, केमार रोच, आंद्रे रसेल या अनुभवी खेळाडुंकडुन असेल.
महत्त्वाचे खेळाडु:- ख्रिस गेल, शाय होप्स, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, केमार रोच, जेसन होल्डर
आयसीसी क्रमवारीतील स्थान:- ६
विश्वचषकातील सर्वोच्च कामगिरी:- १९७५ आणि १९७९ मध्ये विजेतेपद
यशस्वी कर्णधार क्लाईव्ह लॉईड (१९७५, १९७९)
संघाच्या सर्वाधिक धावा ३७२/२ वि. झिम्बाब्वे (२०१५)
निच्चांकी धावसंख्या ९३ वि. केनिया (१९९६)
सर्वाधिक धावा ब्रायन लारा – १२२५ (१९९२ – २००७)
सर्वोच्च धावा ख्रिस गेल – २१५ वि. झिम्बाब्वे (२०१५)
सर्वाधिक शतक व्हिव रिचर्डस – ३
सर्वाधिक सरासरी व्हिव रिचर्डस – ६३.३१
सर्वाधिक मोठी भागिदारी ख्रिस गेल व मार्लन सॅम्युयल्स – ३७२ वि. झिम्बाब्वे (२०१५)
सर्वाधिक बळी कर्टनी वॉल्श – २७ बळी
सर्वाधिक झेल ब्रायन लारा – १६ झेल
सर्वाधिक झेल व यष्टिचीत दिनेश रामदिन – २६ बळी (झेल २६ यष्टिचीत ०)
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण विनस्टन डेविस – ७/५१ वि. ऑस्ट्रेलिया (१९८३)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा व्हिव रिचर्डस (१९८७) – ३९१ धावा
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी जेरॉम टेलर (२०१५) – १७ बळी
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल किरॉन पोलार्ड (२०११) – ६ झेल
एका विश्वचषकात सर्वाधिक झेल व यष्टिचीत जेफ दुजॉं (१९८३) – १६ बळी (झेल १५ यष्टिचीत १)

संघ:- जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, शाय होप्स, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, केमार रोच, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्राथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिल, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, निकोल्स पुरन, ओशेन थॉमस
३१ मे २०१९ वि. पाकिस्तान इंग्लंड दु. ३.००
६ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया दु. ३.००
१० जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका दु. ३.००
१४ जुन २०१९ वि. इंग्लंड दु. ३.००
१७ जुन २०१९ वि. बांग्लादेश दु. ३.००
२२ जुन २०१९ वि. न्युझिलंड सं. ६.००
२७ जुन २०१९ वि. भारत दु. ३.००
१ जुलै २०१९ वि. श्रीलंका दु. ३.००
४ जुलै २०१९ वि. अफगानिस्तान दु. ३.००

शंतनु कुलकर्णी
क्रिकेट लेखक
www.thedailykatta.com

Leave a Comment